राजापूर केंद्रशाळेची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी!
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत राजापूर केंद्रशाळेने लहान गटातही उत्कृष्ट कामगिरी करून दोन स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळवले आहे.
राजापूर केंद्रशाळेची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी!
राजापूर, 7 जानेवारी 2024: स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत राजापूर केंद्रशाळेने लहान गटातही उत्कृष्ट कामगिरी करून दोन स्पर्धेत जिल्हास्तरावर यश मिळवले आहे.
विजेते:
- 4x100 रिले (लहान गट): जिल्हा द्वितीय क्रमांक (सहभागी विद्यार्थी आयुष अनिल मदने ,अर्णव श्रीकांत घनवट ,यश योगेश शिरतोडे ,पृथ्वीराज अमोल जाधव (दरुज )आणि सोहम प्रमोद घनवट)
- 400 मीटर धावणे (लहान गट): आयुष अनिल मदने - जिल्हा तृतीय क्रमांक
यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन:
सर्व यशस्वी खेळाडू, त्यांचे पालक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले जाते. रॉयल अकॅडमी ललगुण येथे सरावासाठी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून मार्गदर्शन करणारे या अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष दीपक शिरतोडे, बाबू सर, सनी सर यांचेही अभिनंदन.
अन्य सहकारी:
खटावच्या गट शिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे मॅडम, शिक्षण विस्ताराधिकारी संगीता गायकवाड मॅडम, सोनाली विभुते मॅडम, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे साहेब, एस के जाधव साहेब, राजापूरच्या सरपंच वनिता पवार मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप घनवट, राजेंद्र घाटगे पाटील (बापू), हणमंतराव घनवट गुरुजी, दशरथ घनवट गुरुजी, जोतीराम घनवट गुरुजी, नारायण घनवट गुरुजी तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
बक्षीस वितरण:
शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य श्री महेश पालकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर मॅडम, गटशिक्षणाधिकारी सातारा रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी जावळी संजय धुमाळ यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.
राजापूर केंद्रशाळेच्या या यशाबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा!